टोरंटो – मला काहीही झालेले नाही. मी आणि माझे कुटुंबिय पूर्णपणे सुरक्षित आहोत,अशी पोस्ट गायक एपी धिल्लन याने आज केली.धिल्लन याच्या घरावर काल लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड रोहित गोदरा याने गोळीबार केला होता. त्यामुळे धिल्लन याचे चाहते चिंतेत होते.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर आहे. गायक धिल्लन याचा सलमान खानसोबतचा एक व्हिडिओ अल्बम नुकताच प्रसारित झाला आहे. त्यामुळे बिश्नोई टोळीने धिल्लन याच्या टोरंटो येथील घरावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात धिल्लनला इजा झाली नाही.मात्र त्याच्या असंख्य चाहत्यांना त्याची चिंता वाटत होती. त्यामुळे धिल्लनने सोशल मीडियावर पोस्ट करून आपण सुखरूप असल्याचे सांगितले.