मुंबई – गोरेगावच्या फिल्मसिटी परिसरात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी या सेटवर २०० लोक उपस्थित होते. ही घटना मंगळवारी घडली.
सेंटवर बिबट्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. सर्वजण सैरावैरा पळू लागले. मात्र, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर ऑल इंडियन सिने वर्क असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी असा इशारा दिला आहे की, ‘बिबट्याने कुणावर हल्ला केला असता तर याला जबाबदार कोण, फिल्मसिटीत वारंवार बिबट्या शिरल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, सरकार याबाबत सुरक्षेच्या काहीच उपाययोजना करत नाही. यापुढेही सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर हजारो मजदूर आणि कलाकारांकडून संप पुकारण्यात येईल.
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची पुन्हा एंट्री
