मुंबई – मराठी बिग बॉसमधून प्रेक्षकांची मने जिंकणारे आगरी-कोळी गीतांचे गायक दादूस ऊर्फ संतोष चौधरी याने मुंबईतील शिवडी येथील एका हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संतोष चौधरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले.
गायक दादूसने शिवडी येथे वादक आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन भांगरे याच्या हळदीत गाणे गात असताना अचानक खिशातून आपली बंदूक काढून हवेत गोळीबार केला होता.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी प्रथम नवरदेवाच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना ती बंदूक खेळण्यातली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी गायक दादूसला चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यावेळी त्याने आपण केवळ करमणूक म्हणून खेळण्यातली बंदूक वापरली होती असे सांगितले. त्यामुळे त्याची पोलिसांनी सुटका केली. तसेच याप्रकरणी कोणता गुन्हाही दाखल केला नाही.
मराठी बिग बॉस फेम गायक दादूसला अटक आणि सुटका
