मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती 2023-2028 ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. दामले यांना 60 पैकी 50 मते मिळाली. यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या विरोधात प्रसाद कांबळी उभे होते. या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी 8 जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांचे उमेदवार निवडून आले. प्रशांत दामलेंच्या ’रंगकर्मी नाटक समूहा’चे कार्यकारिणीवर वर्चस्व आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर, कोषाध्यक्षपदी सतीश लोटके, प्रमुख कार्यवाहपदी अजित भुरे आणि सहकार्यवाह पदी समील इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनील ढगे यांचा समावेश आहे. 11 जणांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले
