मराठी चित्रपटांना थिएटर नाही अभिनेता प्रथमेश परबची खंत

मुंबई – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मात्र आज राज्यात मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृह उपलब्ध नाहीत अशी खंत अभिनेता प्रथमेश परब याने व्यक्त केली आहे.प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये ही खंत व्यक्त केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते, त्याच्या संहितेवर, व्यक्तीरेखेवर नकळत प्रेम जडू लागते. अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो, आपली व्यक्तीरेखा मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचे मनोरंजन करावे असे प्रत्येक कलाकाराला वाटते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो लोकांना आवडतो. त्यांच्या डोळ्यातील अश्रू, आशीर्वाद, कलाकारांशी साधलेला संवाद अनुभवायला मिळतो. आज प्रेक्षकांना सिनेमा पाहायचा आहे .मात्र त्यांना तो दाखवायला आमच्याकडे चित्रपटगृहेच उपलब्ध नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रातच स्क्रिन मिळत नाही यापेक्षा दुर्दैव काय असू शकते.प्रथमेशच्या या पोस्ट आधी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top