Home / News / मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या पायरीवर पोहचले

मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या पायरीवर पोहचले

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यातील वांग मराठवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. हे धरणाचे पाणी मेंढ येथील माध्यमिक...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यातील वांग मराठवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. हे धरणाचे पाणी मेंढ येथील माध्यमिक शाळा इमारतीच्या पायरीपर्यंत पोहोचल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

मराठवाडी धरणाचे बांधकाम २७ वर्षांनंतर पूर्ण झाल्याने यंदा पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
त्यातच पावसामुळे या धरणातील पाण्याची आवक वाढली आहे.या धरणाच्या पाण्याने मेंढ गावाला वेढा दिला आहे.आता तर धरणाचे पाणी गावातील शाळेच्या आवारातील पायरीपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार या शाळेला सध्या सुट्टी देण्यात आली आहे.तसेच गावातील जुनी मंदिरे आणि बंद शाळेची जुनी इमारतही पाण्याखाली बुडाली आहे.विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून याठिकाणी अशी परिस्थिती उद्भवत आहे

Web Title:
संबंधित बातम्या