मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या संध्याकाळी राज्यसभेचे खासदार शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेणार आहे. या भेटीत सध्याच्या राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.ममता बॅनर्जी कोलकत्याहून विशेष विमानाने आज दुपारी मुंबईत दाखल झाल्या. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात त्या सहभागी झाल्या. त्यानंतर उद्या ममता बॅनर्जी सिल्वर ओक निवासस्थानावर पोहोचणार आहेत.