नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम केवळ रेडिओवर प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. या कार्यक्रमाचा ११४ वा एपिसोड होता. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांचे विचार लोकांसमोर मांडले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा भाग मला भावूक करत आहे. कारण आम्ही ‘मन की बात’चा १० वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहोत. १० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबरला विजयादशमीला ‘मन की बात’ सुरू झाली. यावर्षीही ३ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे, जो पवित्र योगायोग आहे. मसालेदार आणि नकारात्मक चर्चा असल्याशिवाय कार्यक्रमाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा सामान्यतः एक समज निर्माण झाला आहे. पण मन की बातने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. लोकांना सकारात्मक शब्द आणि प्रेरणादायी उदाहरणे आवडतात. या कार्यक्रमाशी संबंधित पत्रे वाचून त्यांना अभिमान वाटतो की देशात किती प्रतिभावान लोक आहेत आणि त्यांच्यात देश आणि समाजाची सेवा करण्याची किती तळमळ आहे. ‘मन की बात’ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी मंदिरात जाऊन देव पाहण्यासारखी आहे.
‘मन की बात’ला १० वर्षे पूर्णपंतप्रधान मोदी झाले भावुक
