नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील नागरिकांशी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. ३० एप्रिलला या कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण झाल्यावर एक नाणे जारी केले जाणार आहे. हे नाणे शंभर रुपयांचे असेल, ज्यावर ‘मन की बात १००’ लिहिलेले असणार आहे.नाण्यावर मायक्रोफोन २०२३ असे चिन्हांकित केले जाणार आहे. हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष खूप मेहनत घेत आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांना बुथवर १०० वा भाग ऐकता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
यापूर्वीही सरकारकडून अनेकदा १०० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांसाठी १०० रुपयांचे नाणे जारी केले होते. तसेच राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० रुपयांचे नाणे जारी केले होते.