मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आज त्यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता ते घरी आले आहेत. मनोहर जोशी यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना 22 मी रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती थोडी गंभीर होती. पण उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने, त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आणि आज सायंकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मनोहर जोशी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
