मनोहर जोशी, पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण! अशोक सराफ, अश्विनी भिडे, विलास डांगरेंना पद्मश्री

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले. त्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि दिवंगत गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ, गायिका अश्विनी भिडे, महाराष्ट्राचे प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, प्रतिभावंत लेखक-वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
गायिका शारदा सिन्हा, सुझुकी मोटरचे माजी सीईओ ओसामू सुझुकी, एमटी वासुदेवन नायर, निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर, कुमुदिनी रजनीकांत लखिया, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम आणि दुव्वुर नागेश्वरा रेड्डी यांना पद्मविभूषण आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील मोदी आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय, माजी हॉकीपटू पीआर श्रीजेश, साध्वी ऋतंभरा, अभिनेता एस.अजित कुमार आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासह 19 जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू आर आश्विन, ब्राझीलचे हिंदू आध्यात्मिक नेते जोनास मॅसेट्टी आणि प्रख्यात जोडपे ह्यू आणि कॉलीन गँट्झर केल्याबद्दल पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.
यासोबत भक्ती गायक भेरू सिंग चौहान,पत्रकार भीम सिंग भावेश,कादंबरीकार जगदीश जोशीला,गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या अधिवक्ता नीरजा भाटला आणि कुवेतच्या योग थेरपिस्ट शेखा एजे अल सबा, पुडुचेरीच्या पी. दत्तनमूर्ती(कला संगीत), हिमाचल प्रदेशचे हरिमन शर्मा (कृषीसंशोधक), सिक्कीमच्या नरेन गुरुंग(कला-गायन,नेपाळी), हरियाणाच्या हरविंदर सिंग (क्रीडा -दिव्यांग तिरंदाजी), मध्य प्रदेशच्या भेरू सिंग चौहान (कला गायन,निर्गुण)यांच्यासह 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top