मनीष सिसोदियांच्या इडी कोठडीत वाढ

नवी दिल्ली – दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिला आहे. सिसोदिया यांची बुधवारी ५ एप्रिलला न्यायालयीन कोठडी संपली. त्यांना आज दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर पुढील युक्तिवादासाठी १२ एप्रिलची तारीख निश्चित केली. याशिवाय न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात सोसोदीया यांची सीबीआय आणि इडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून कडून चौकशी सुरु आहे. यापूर्वी सीबीआयने नोंदवलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात मनीष सिसोदिया यांना १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Scroll to Top