मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुढीपाडव्याची जाहीर सभा दादरच्या शिवाजी पार्कातच होणार आहे. ही सभा घेण्यासाठी मनसेला मुंबई महापालिकेने सशर्त परवानगी दिली आहे. पालिकेने 24 अटी घातल्या आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी देखील सभा घेण्यास होकार दिला आहे.
22 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात जाहीरसभा घेण्याचे ठरवले होते. या सभेच्या परवानगीसाठी मनसेने मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडे अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारत मनसेला महापालिकेने 24 अटींसह परवानगी दिली. तसेच पोलिसांनीही परवानगी दिली.