Home / News / मनसेची ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर

मनसेची ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली ३२ उमेदवारांची सहावी यादी काल रात्री जाहीर केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः...

By: E-Paper Navakal

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली ३२ उमेदवारांची सहावी यादी काल रात्री जाहीर केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः एक्स पोस्ट करून यादी जाहीर केली.नाशिक पूर्वमधून प्रसादा सानप यांना, देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव, नाशिक मध्यमधून अंकुश पवार, जळगाव ग्रामीणमधून मुकुंद रोटे, विलेपार्लेमधून जुईली शेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर आणि उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना संधी देण्यात आली आहे.राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील कार्यक्रमात आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री जाहीर केलेल्या यादीत या दोघांची नावे होती. यादीत एकूण ४५ उमेदवारांची नावे होती. त्यानंतर तिसऱ्या यादीत १३, चौथ्या यादीत ५, पाचव्या यादीत १५ आणि सहाव्या यादीत ३२ अशी आतापर्यंत ११० उमेदवारांची नावे मनसेने जाहीर केली आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या