मनमाड – मनमाड बाजार समितीत मार्केट फी कमी करण्याच्या प्रश्नावर व्यापाऱ्यांनी मंगळवारी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कांदा लिलाव ठप्प झाला होता. बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.त्यात सकारात्मक निर्णय झाल्याने आज २ दिवसांनंतर बाजार समितीतील कांदा लिलाव सुरु झाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला.नाशिकच्या मनमाड बाजार समितीची फी १ रुपयांवरुन ७५ पैसे करावी या मागणीसाठी २ दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता.तेव्हापासून मनमाड बाजार समिती बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. व्यापाऱ्यांनी बाजार फी ७५ पेसे देण्याबाबत पत्र दिल्यानंतर तात्काळ बाजार फी ९० पेसे करण्यात आली. मात्र फी कमी करण्याचा निर्णय पुढील काळात घेण्याचे आश्वासन देवूनही व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता.अखेर काल बाजार समिती संचालक-व्यापारी यांची बैठक होऊन मध्य मार्ग काढत बाजार फी ८५ पैसे करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बंद मागे घेतला. त्यामुळे आजपासून बाजार समिती सुरू झाली.
मनमाड कृषी बाजार समितीत कांदा लिलाव २ दिवसां नंतर सुरू
