ठाणे- मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी लातूर बिदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
लातूर-बीदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे ही एक्स्प्रेस एकाच ठिकाणी थांबली. त्यामुळे जलद मार्गावरील सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खोंळबल्या. सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकलसेवा अर्धातास उशिराने धावली. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत! एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
