भुसावळ -मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागात १ ते ११ ऑगस्टदरम्यान पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे. मेगाब्लॉकदरम्यान नागपूर-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. भुसावळ स्थानकातून जाणारी गाडी क्रमांक १२११९ अमरावती -अजनी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १२१२० अजनी -अमरावती या दोन्ही एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द असेल. तसेच गाडी क्रमांक १२१५९ अमरावती -जबलपूर एक्सप्रेस ४, ५, ९ आणि १० ऑगस्ट रोजी रद्द कऱण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२१६० जबलपूर -अमरावती एक्सप्रेस ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द असणार आहे.गाडी क्रमांक २२१२४ अजनी -पुणे हमसफर एक्सप्रेस ६ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२११७ पुणे -अमरावती एक्सप्रेस ७ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१४१ पुणे -नागपुर हमसफर ८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२११८ अमरावती -पुणे एक्सप्रेस ८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१४२ नागपुर – पुणे हमसफर एक्सप्रेस ९ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१३९ पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस १० ऑगस्ट व गाडी क्रमांक २२१४० अजनी – पुणे हमसफर एक्सप्रेसची ११ ऑगस्टला धावणारी फेरी रद्द करण्यात येणार आहे.