पुणे – मध्ये रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकातील विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या या सहा दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे विभागातील १९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात येतील. तर २२ एक्स्प्रेसचे मार्गही बदलले जातील. मध्य रेल्वेच्या बदलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, ३० जुलैला हुजूर साहेब नांदेड- पनवेल एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू, पनवेल – हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर डेमू, दौंड-निजामाबाद डेमू, अमरावती-पुणे, हडपसर-दौंड डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे -दौंड मेमू पैसेंजर, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-हरंगुल-पुणे स्पेशल, दौंड-सोलापुर-दौंड डेमू या गाड्या रद्द करण्या आल्या आहेत. तर ३१ जुलै रोजी सिकंदराबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस,पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर डेमू, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस,दौंड-निजामाबाद डेमू, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-हडपसर डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे-दौंड मेमू पैसेंजर, पुणे-दौंड-पुणे डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.