मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई- रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी व विविध अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेवर रविवार १९ मार्चला मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत राहणार आहे. यासंदर्भातील माहिती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या स्लो ट्रॅकवरील गाड्या विद्याविहार स्थानकांपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे नेहमीच्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या लोकल गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

Scroll to Top