मुरैना :- मध्य प्रदेशातील मुरैनाच्या लेपा भिसोडा गावात आज सकाळी एकाच कुटुंबातील ६ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, गावातील २ कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून सकाळी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर गोळीबार केला. त्यात एकाच कुटुंबातील ३ पुरुषांसह ३ महिलांचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले.
भिसोडा हे काँग्रेस आमदार रवींद्र सिंह यांचे हे गाव असून येथील हत्याकांडाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यात हल्लेखोर काही जणांना काठीने मारहाण करत असल्याचे दिसून आले. तसेच काही जण बंदुका व लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे होते. त्यापैकी १ तरुणाने ५ जणांवर गोळीबार केला. घटनास्थळी लहान मुलेही होती. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला.