भोपाळ- मध्य प्रदेश सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने धार्मिक आणि पवित्र शहरांमध्ये दारुबंदीची घोषणा केली आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त
खरगोणमधील महेश्वरच्या कॅबिनेट बैठकीत १७ शहरात दारुबंदी निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी घेतलेल्या या निर्णयाची देशभर चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने १७ शहरे, नगरपरिषदा, आणि धार्मिक ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरांमध्ये उज्जैन, ओंकारेश्वर, मैहर, खजुराहो, महेश्वर, ओरच्छा, सांची, नलखेडा, सलकनपूर जबलपूर, मंदसौरा या जिल्ह्यांच्या नावाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नर्मदा नदी पात्रातील ५ किलोमीटरच्या हद्दीत दारूबंदीचा निर्णय कायम राहणार आहे. उज्जैन आणि ओंकारेश्वर ही ज्योतिर्लिंगे आहेत, तर मैहर हे एक शक्तीपीठ आहे. ओरछा येथे राजा राम मंदिर आहे, जिथे भगवान रामाची राजा म्हणून पूजा केली जाते. महेश्वर हे देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे आणि अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे.
मध्यप्रदेशात १७ धार्मिक शहरांत दारूबंदीचा निर्णय
