भोपाळ-उत्तर प्रदेशमधून नागपूरला येणार्या बसला मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला.या अपघातात ९ जण जागीच ठार झाले.तर २४ जण जखमी झाले.हा भीषण अपघात काल शनिवारी रात्री उशिरा घडला.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून निघालेली बस रीवामार्गे नागपूरकडे चालली होती.ही बस मध्यप्रदेशातील मैहरमध्ये उभ्या असलेल्या दगडाने भरलेल्या एका ट्रकला धडकली.या अपघातात बसमधील ९ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मैहर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त बस ही आभा ट्रॅव्हल्सची होती. मैहर जिल्ह्यातील नादानजवळ हा अपघात घडला.बचाव पथकाने बस गॅस कटरने कापून मृतदेह बाहेर काढले. बसमधून सुमारे ४५ प्रवासी प्रवास करत होते.