मदतीसाठी झेलेन्स्कींचे मोदींना पत्र

कीव – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना मदत पाठवण्याची विनंती केली आहे. युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्री एमीन झापारोवा चार दिवसांच्या भारत दौर्‍यावर आहेत. त्यांनी हे पत्र पंतप्रधान मोदींना देत ही मदत मागितली. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र एमीन यांनी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना सुपूर्द केले. पत्रात, युक्रेनने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह अतिरिक्त मानवतावादी पुरवठ्याची विनंती केली आहे. यावर लेखी यांनी ट्विट करून युक्रेनला मानवतावादी मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचा नेता भारत दौर्‍यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने रशियासोबत सुरू असलेले युद्ध सोडवण्यासाठी कीवला मदत करावी अशी इच्छाही एमीन यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top