Home / News / मथुरा-बरेली मार्गावर अपघात ७ जण ठार

मथुरा-बरेली मार्गावर अपघात ७ जण ठार

हाथरस – उत्तर प्रदेशातील मथुरा बरेली महामार्गावर आज झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका ३ महिन्यांच्या बाळाचाही...

By: E-Paper Navakal

हाथरस – उत्तर प्रदेशातील मथुरा बरेली महामार्गावर आज झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका ३ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. एक ट्रक व प्रवासी टेम्पोमध्ये धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना बागला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवासी वाहनातून १० लोक एटा गावातून नगला इमलिया गावी एका कॅन्सर रुग्णाला पाहण्यासाठी जात होते. यावेळी एका ट्रकची त्यांच्या वाहनाला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाला व ट्रकही उलटला. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत घोषित केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या