Home / News / मतदानासाठी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर

मतदानासाठी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान असून या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. अधिकाधिक...

By: E-Paper Navakal

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान असून या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी ही सुटी जाहीर करण्यात आली आहे.या आदेशानुसार राज्यातील उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या उपक्रम व आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना ही सुटी द्यावी लागणार आहे. ज्या आस्थापनांना काम बंद करणे शक्य नसेल त्यांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी असेही आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून सुटी न देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असेही शासन आदेशात म्हटले आहे. संवैधानिक अधिकार बजावण्यासाठी ही सुटी देण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या