मुंबई – विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या तीन दिवसांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे.विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबर रोजी होणार्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या दिवशीच्या परीक्षेचे बदललेले वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये मतदान केंद्र असतात. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील काही इमारतींमध्येही मतदान केंद्र आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कार्यालये असतात.या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबर रोजी होणार्या परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत.विद्यापीठाने या तीन दिवसाचे नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे.त्यानुसार १९ नोव्हेंबरची परीक्षा ३० नोव्हेंबर,२० नोव्हेंबरची परीक्षा ७ डिसेंबर आणि २१ डिसेंबरची परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.