मणिपूर:- मणिपूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून दोन समाजात संघर्ष निर्माण झाल. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. कुकी-नागा आणि मैतेई समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू झाला होता. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी म्हटले की, मणिपूर येथीस हिंसाचारात 230 हून अधिक लोक जखमी झाले आणि 1700 घरे जाळली गेली. 10 दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर येथे इंटरनेट अजूनही बंद आहे.
कुलदीप सिंग यांनी सांगितले की, गुरुवारी मणिपूर कमांडो आणि उपद्रवींमध्ये आणखी एक गोळीबार झाला. ज्यात सहा कमांडो जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. याशिवाय चुराचंदपूर येथे पीडब्ल्यूडीचे तीन कामगार एका वाहनात मृतावस्थेत आढळून आले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 300 मीटर खोल खंदकातून मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचा अपघाती मृत्यू झाला की कोणी खून केला याचा तपास सुरू आहे.