मणिपूर हिंसाचारप्रकरणी रात्री कर्फ्यूकलम १४४ लागू! इंटरनेट सेवाही बंद

इंफाळ- मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त चुराचंदपूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी वन विभागाच्या इमारतीला आग लावल्यानंतर येथील परिस्थिती गंभीर झाली आहे. हिंसाचार आणि तणावाची परिस्थिती पाहता शनिवारपासून परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यात सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून, जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्याबरोबरच चुरुचंदपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि मोबाइल सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.कुकी ग्रामस्थांना आरक्षित वनक्षेत्रातून बेदखल करण्याच्या मोहिमेविरोधात स्थानिक आदिवासी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरु असताना, शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांच्या टोळक्याने तुइबोंग परिसरातील वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या इमारतीला आग लावली होती. या आगीत लाखो रुपयांची सार्वजनिक मालमत्ता जळून खाक झाली असून अनेक सरकारी कागदपत्रे जळून खाक झाली. जिल्हा मुख्यालयात पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या २० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह ज्या ठिकाणी एका जाहीर सभेला संबोधित करणार होते मात्र आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा रद्द केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूर हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. सत्ताधारी पक्ष स्थानिक आदिवासींचे हक्क पायदळी तुडवत असल्याचा आरोप करत, त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top