प अकोला
महाराष्ट्राच्या काही भागात सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. या वादळी पावसामुळे काही ठिकाणच्या घरांचेही नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस गावात मंदिराच्या शेडवर झाड कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर शेडखाली 20 ते 22 भाविक अडकले असून, बचाव पथकाकडून 10 जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.
आज अकोल्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या शेडमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. या शेडखाली आणखी 20 ते 25 भाविक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे मदतीला अडचण निर्माण होत आहे. सततच्या पावसामुळे झाड बाजूला करताना अडचणी येत आहेत.
वादळी वार्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. अकोला जिल्ह्यातील पारस गावात वादळाने लिंबाचे मोठे झाड बाबूजी महाराज मंदिरातील शेडवर कोसळले आहे. या शेडखाली 20 ते 25 भाविक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेडवर पडलेलं झाड हटविण्यात पावसामुळे अडचणी येत आहेत. घटनास्थळी हवा आणि पावसाने मदत कार्यात अडचण होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हे झाड हटवण्याचे काम सुरू आहे.