जालना- शिंदे गटाचे खासदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी आज सका ळी १०:३० वाजता अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर १७ सप्टेंबरला दौऱ्यावर असणार आहेत. याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे आणि भूमरेंची भेट झाली. संदिपान भुमरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला वाटते १७ तारखेपर्यंत गॅझेट जर लागू केले, तर मुक्तिसंग्राम दिनी मराठ्यांसाठी एक आनंदाचा दिवस उगवू शकतो. आपण हे काम तातडीने करावे हेच मी भुमरेसाहेबांना सांगितले. संदीप भुमरे म्हणाले की, मनोज जारांगे यांची भेट मी आजच नाही, नेहमी घेत असतो. त्यात विशेष असे काही नाही. उद्या मुख्यमंत्री येणार आहेत. ते हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात सांगतील. मराठा समाजाला लवकर कसा न्याय मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.
मंत्री संदिपान भुमरेंनी जरांगेंची भेट घेतली
