बीड – अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना परळीच्या फौजदारी कोर्टाने करणे दाखवा नोटीस बजावली आहे. धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. करुणा या पहिली पत्नी असल्याचा आणि त्यांच्या नावावरील मिळकतीचा त्यांनी उल्लेख केला नाही.
करुणा यांनी यावर आक्षेप घेत कोर्टात ऑनलाईन तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात दाखल केली. त्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी सोमवार २४ फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी कोर्टात सुनावणी होणार आहे.