मंडी- शिमल्यातील अवैध मशिदीचे प्रकरण तापत असताना हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये मुस्लीम समुदायाने स्वतःहूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमण पाडले. एका मशिदीने ३३ वर्ग मीटर जागेवर अतिक्रमण केले होते. त्यातील कुंपण व एक खोली मुस्लीम समुदायाने स्वतःच जमीनदोस्त केली.
मंडी येथील जेल रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर एक अनधिकृत मशीद उभी होती. त्यांनी ३३ वर्ग मीटर जागेवर कब्जा केला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या लोकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या जागेवरील कुंपणाची भिंत व एक खोली स्वतःच पाडली. या मशिदीच्या दोन मजल्यांबद्दल उद्या न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे.