Home / News / भ्रष्टाचार प्रकरणी पेरुच्या माजीराष्ट्राध्यक्षांना २० वर्षांची शिक्षा

भ्रष्टाचार प्रकरणी पेरुच्या माजीराष्ट्राध्यक्षांना २० वर्षांची शिक्षा

लिमा – देशातील रस्ते बांधण्याचे कंत्राट देण्याच्या बदल्यात ब्राझीलच्या एका बांधकाम कंपनीकडून ३५ कोटी अमेरिकन डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी पेरुचे माजी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

लिमा – देशातील रस्ते बांधण्याचे कंत्राट देण्याच्या बदल्यात ब्राझीलच्या एका बांधकाम कंपनीकडून ३५ कोटी अमेरिकन डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी पेरुचे माजी राष्ट्राध्यक्ष अलेजांड्रो टोलेडो यांना २० वर्ष ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टोलेडो हे ७८ वर्षांचे असून ते २००१ ते २००६ या काळात पेरुचे राष्ट्राध्यक्ष होते.

राष्ट्राध्यक्ष अल्जेन्ड्रो टोलेडो यांनी पेरुच्या दक्षिणेकडील रस्त्यांच्या बांधकामासाठी २७ कोटी पौंडाची लाच घेतली होती. ब्राझिलच्या कंपनीनेही आपण राष्ट्राध्यक्षांना कोट्यवधी रुपये दिल्याचे मान्य केल होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती इनेस रोजास यांच्यासमोर झाली. ते म्हणाले, राष्टाध्यक्ष पदाच्या काळात देशाचे हित लक्षात घेऊन त्याचे संरक्षण करण्याऐवजी त्यांनी गैरव्यवहारातून पैसे मिळवले. त्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात येत आहे. २०१९ मध्ये पेरुचे दुसरे राष्ट्राध्यक्ष अलन गार्शिया यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या आरोपाखाली पोलीस अटक करायला आले असता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ब्राझिलच्या बांधकाम कंपनीने दोन माजी राष्ट्राध्यक्षांना पैसे दिल्याचे म्हटले होते. राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या