भोगावती साखर कारखान्याच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ

कोल्हापूर

कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मतदार प्रतिनिधींनी मतमोजणी करणाऱ्यांवर मतपत्रिकेत खाडाखोड केल्याचा आरोप करत त्यांना घेराव घातला. यामुळे काही काळासाठी मतमोजणी प्रकिया थांबवण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर होते.

भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले.आ ज याची मतमोजणी रमणमळ्यातल्या बहुउद्देशीय सभागृहात सुरू होती. यावेळी मतदार प्रतिनिधींनी महसूल यंत्रणा सत्ताधार्यांच्या बाजूने असून मतपत्रिकेत खाडाखोड करत असल्याचा आरोप गोंधळ घातला. मात्र काही काळाने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. त्यानंतर मतमोजणीला पुन्हा सुरूवात करण्यात आली.

शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष जर्नादन पाटील म्हणाले की, संस्थांचे सचिव मतमोजणीसाठी असतील , तर नक्कीच ही यंत्रणा मॅनेज केली आहे. सेवा संस्थेचे सचिव बदला आणि कर्मचारी नेमा. सत्ताधारी लोकांनी एवढा मोठा कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. तरीही ते अशा पध्दतीची मतमोजणी यंत्रणा वापरत आहेत. हा कारखाना शेतकऱ्यांच्या घामातून उभारला आहे. अशी पध्दत वापरली तर हा साखर कारखना पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top