भैरवनाथाच्या जयघोषात
प्रसिद्ध बगाड यात्रेचा जल्लोष

सातारा – वाईच्या बावधन गावातील बगाड यात्रेचा आज महत्त्वाचा दिवस होता. भैरवनाथाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते. 50 फूट उंच बांधलेली बगाड पाहण्यासाठी आणि त्याचा थरार अनुभवण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आणि एकच जल्लोष साजरा केला. तसेच या यात्रेत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते.
यावर्षी बगाड यात्रेचा ‘बगाड्या` होण्याचा मान दिलीप शंकर दाभाडेंना मिळाला. भावाच्या मृत्यूनंतर दिलीप हे नाथांच्या कौलासाठी बसत होते. या यात्रेतील आजच्या मुख्य दिवशी महाराष्ट्राभरातून हजारो भाविक दाखल झाले होते. भाविकांनी बैलजोडीच्या साहाय्याने 50 फुट उंच लाकडी बगाड शेतातून पळवली. जसजशी यात्रा पुढे सरकत होती. तसतशी भाविकांमध्ये जोश संचारत होता. त्यानंतर ही बगाड बावधन गावात नेल्यावर गावातील लोकांनी एकच जल्लोष केला. बावधनमधील भैरवनाथाची बगाड यात्रा फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे.

Scroll to Top