Home / News / भूकंप पाकिस्तानात धक्के दिल्ली-पंजाबमध्ये

भूकंप पाकिस्तानात धक्के दिल्ली-पंजाबमध्ये

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या करोर येथे आज ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि पंजाबमध्ये बसले. पाकिस्तानातील पेशावर,...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या करोर येथे आज ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि पंजाबमध्ये बसले. पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर आणि भारतातील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, यात कोणतीही जीवित वा मालमत्तांची हानी झालेली नाही. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस ने सांगितले की, पाकिस्तानमध्ये आज दुपारी १२.५८ वाजता ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला . या भूकंपाची खोली १० किलोमीटर खोली होती.

दिल्ली आणि आसपासच्या भागात दोन आठवड्यांत भूकंपाची ही दुसरी घटना आहे. २९ ऑगस्ट रोजी, ५.७-रिश्टर स्केलचा भूकंप अफगाणिस्तानात झाला होता. या भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २५५ किलोमीटर होती.

Web Title:
संबंधित बातम्या