भूकंपामुळे गिर्यारोहकांसाठी माउंट एव्हरेस्ट बंद

शिजांग – तिबेटच्या नेपाळ सीमेनजिक असलेल्या शिजांग शहराला काल ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपाचा हादरा तिबेट, नेपाळसह भारतातील बिहार, आसाम व पश्चिम बंगालच्या काही भागांनाही बसला. या भूकंपानंतर चीनने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट गिर्यारोहक व पर्यटकांसाठी बंद केला आहे. या प्रदेशाची ओळख माऊंट कोमोलांग्मा असून, डिंगरी हा माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे. या प्रदेशात पर्यटकांना तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे हॉटेल इमारती आणि आजूबाजूचा परिसराची कोणतीही हानी झालेली नाही. बेस कॅम्पवरील कर्मचारी आणि पर्यटक सुरक्षित आहेत. परंतु सावधगिरी म्हणून सर्व तपासणी होईपर्यंत एव्हरेस्ट चढाई बंद केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top