भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस तब्बल महिनाभर बंद राहणार

मनमाड- सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारी आणि दररोज मनमाडमार्गे धावणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना तुडूंब गर्दी उसळलेली असताना मध्य रेल्वे प्रशासनाने ही गाडी २० मे ते १ जूनपर्यंत रद्द केली आहे.

ही गाडी रद्द करतानाच या काळात भुसावळ-पुणे एक्स्प्रेसचा रॅक इगतपुरी-भुसावळ मेमू या गाडीसाठी संलग्न करण्यात आला आहे. मेमू या काळात दररोज धावणार आहे .गाडी क्रमांक ११०२५/११०२६ भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी-पुणे-इगतपुरी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. ११०२५ आणि ११०२६ या गाडीचा रेक गाडी क्र.११११९/१११२० भुसावळ-इगतपुरी-भुसावळ मेमू म्हणून चालवण्यात येणार आहे.

मेमू भुसावळ येथून रात्री ११.३५ वाजता सुटणार असून इगतपुरीला सकाळी ६.१० वाजता पोहचेल. मेमू इगतपुरी येथून सकाळी ९.५५ वाजता सुटणार असून भुसावळ येथे सायंकाळी ५.१० वाजता पोहचेल. मेमू भुसावळ येथून सकाळी ७ वाजता निघेल आणि इगतपूरी येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी पोहचेल. इगतपुरी येथून ती संध्याकाळी ५.१० वाजता निघेल व भुसावळला रात्री १० वाजता पोहोचेल, अशी रेल्वे प्रशासनाने काढलेल्या पत्रकात दिली आहे. हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी याआधी जानेवारी ते मार्च अशी दोन महिने बंद होती. त्यानंतर आता पुन्हा महिनाभर ही गाडी बंद राहणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top