मुंबई – मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ही रक्कम कोणाची आहे, कुठून आली आणि कुठे नेली जात होती. याचा तपास सध्या पोलीस करत आहे. तसेच, या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी पैसे सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यातील वडगाव शेरी येथे पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. तर हडपसर येथेही २२ लाख ९० हजार रुपये सापडले होते. त्यानंतर नागपुरातही एका व्यक्तीकडून सात लाख रुपये जप्त करण्यात आले होते.