पुणे- आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याचा वार्षिक सभेला अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील आणि त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी आम्हाला बसू दिले नाही, मंचावर येऊ दिले नाही. बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला. हे सर्व घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले; असा आरोप देवदत्त निकम यांनी केला. या मुद्द्यांवरून वळसे पाटील आणि निकमांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मंत्री वळसे-पाटलांनी शांततेचे आवाहन केले. मात्र सभेत वेगवेगळ्या कारणांवरून राडा सुरूच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत देवदत्त निकम यांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली.
भीमाशंकर साखर कारखाना सर्वसाधारण सभेत राडा
