भिवंडी- भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली . या गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीमुळे गोदामात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल होऊन अग्निशमन दलाचे जवानांनी आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचा स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
भिवंडीतील लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग
