भिवंडी – भिवंडीच्या वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ९ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलासह पोलिसांना यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांचे बचावकार्य सुरू होते.
या इमारतीच्या या तळमजल्यावर एक गोदाम होते. या गोदामात २० ते ३० जण काम करत होते. तर वरती मजल्यावर रहिवासी राहात होते. दुपारी ही इमारत अचानक कोसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी झाले आणि तत्काळ बचावकार्य सुरू केले. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.