Home / News / भास्कर जाधवांचे चिरंजीव अजित पवारांच्या भेटीला

भास्कर जाधवांचे चिरंजीव अजित पवारांच्या भेटीला

रत्नागिरी- ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. अजित पवार...

By: E-Paper Navakal

रत्नागिरी- ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर आलेले असताना विक्रांत यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी गप्पा मारल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीची राजकीय चर्चा आहे.
विक्रांत जाधव यांची गुहागर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. यंदा काहीही करून विधानसभा लढायची, असाच त्यांचा प्रण आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहे. विक्रांत जाधव यांनी सांगितले की, आमची भेट केवळ कौटुंबिक असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या शहरात आल्यामुळे त्यांचे स्वागत केले.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts