धाराशिव – विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आता थेट अजित पवारांच्या सासरवाडीत भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले. धाराशिव जिल्ह्यातील तेर गावाच्या चौकाचौकात अजित पवार ’भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागले होते. या बॅनरवर अजित पवार यांच्यासह शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेही फोटो आहेत. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले होते. सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील ’तेर’मध्ये आहे. जिथे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते बॅनर्स लावले.
अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याची ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे. गावातील चौकाचौकात बॅनर्स लागले आहेत. ’तेरचे जावई, आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार’ असा मजकूर या बॅनर्सवर आहे.
भावी मुख्यमंत्री अजित पवार सासरवाडीत झळकले बॅनर
