नवी दिल्ली – भारत देशाची लोकसंख्या २०३६ अखेर तब्बल १५२.२ कोटींवर पोहोचणार आहे. त्यातील स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये मात्र सुधारणा होणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
हा अहवाल केंद्रीय सांख्यिकी विभागाने प्रसारित केला आहे.यामध्ये म्हटल्यानुसार २०३६ पर्यंत देशाची लोकसंख्या १५२.२ कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.२०११ साली पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण ४८.५ टक्के होते. २०३६ पर्यंत मुलींच्या जन्म दरात वाढ होऊन हे प्रमाण ४८.८ टक्क्यांवर जाईल. जन्म दरात घट होत असल्याने या कालावधीत १५ वर्षाखालील अल्पवयीनांमध्येही घट होण्याची चिन्हे आहेत. याउलट ६० वर्ष आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत मात्र या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.२०११ च्या तुलनेत
२०३६ पर्यंत लोकसख्येमध्ये स्त्रियांच्या प्रमाणात वाढ होणार आहे.२०११ साली
पुरुषांच्या तुलनेत (दर हजारी) स्त्रियांचे प्रमाण ९४३ होते.हे प्रमाण उपरोक्त कालावधीत ९५२ वर जाणार आहे.