डलास: अमेरिकेतील स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी २०२३ स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांचे वर्चस्व कायम राखत फ्लोरिडा येथील १४ वर्षीय देव शाह याने ‘सॅमोफाइल’ शब्दाचे अचूक स्पेलिंग करून प्रथम क्रमांक पटकावला. नॅशनल हार्बर, मेरीलँड येथे गुरुवारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा विजेता म्हणून देव शहा याला ट्रॉफी आणि ५०,००० डॉलर रोख बक्षिस देण्यात आले.
२३१ स्पर्धकांपैकी ११ अंतिम स्पर्धकांपैकी १० भारतीय वंशाचे होते. अंतिम फेरीत शाहचा सामना व्हर्जिनियाच्या १४ वर्षीय शार्लोट वॉल्शशी झाला.त्याने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे. तर श्रद्धा राचमरेड्डी आणि सूर्या कापू यांनी १५,००० च्या बक्षीस रकमेसह तिसरे स्थान पटकावले आहे. फ्लोरिडा येथे वास्तव्यास असलेला देव शहा हा लार्गोमध्ये आठवीचा विद्यार्थी आहे. शीर्षस्थानी पोहोचण्यापूर्वी, त्याच्याकडे शिस्टोर्राचिस, एगैग्रस आणि काही शब्द त्याने अचूकपणे लिहिलेले होते. ‘सॅमोफाइल’ शब्दाचे अचूक स्पेलिंग करून त्याचा उल्लेख वालुकामय मातीत वाढणारा जीव असा केला.
भारतीय वंशाच्या मुलांचे वर्चस्व असलेली ही स्पर्धा केवळ स्पेलिंगचीच चाचणी घेत नाही, तर शब्दांची उत्पत्ती आणि त्यांची रचना आणि वापर यांच्या ज्ञानाचीही चाचणी घेते. बाळू नटराजन यांनी १९८५ मध्ये ही स्पर्धा जिकली होती. भारतीय वंशाच्या २१ मुलांनी ही स्पर्धा जिंकली आहे. २००८ ते २०१८ पर्यंत या स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांची मक्तेदारी होती.