भारतीय नौदलात आणखी २००
ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात होणार

नवी दिल्ली – भारतीय नौदलाला आणखी ताकदवान करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यात २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी भारतीय नौदल २० हजार कोटी रुपयांचा व्यवहार करणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे आता चीनचा ताप वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयात ही प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. याबाबत लवकरच संरक्षण अधिग्रहण परिषदेसोबतही बैठक होणार आहे.

ही क्षेपणास्त्रे मुख्य शस्त्र असून ती समुद्रात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरली जातात. ती सर्व स्वदेशी बनावटीची आहेत. हल्लीच कोलकाता श्रेणीतील युद्धनौकेवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. याकरीता अपग्रेडेड मॉड्युर लाँचरचा वापर करण्यात आला. ब्रह्मोस एरोस्पेस भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. भारतीय नौदल स्वावलंबनाकडे पावले टाकत आहे. भारतीय नौदल जहाजांवर स्वदेशी साधक बसवणार आहे. ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केले आहे.

डीआरडीओ क्षेपणास्त्रांशिवाय, ब्रह्मोस एरोस्पेस पाणबुडी, जहाजे, विमाने आणि लँड प्लॅटफॉर्म देखील बनवते. नौदलाने २०० ब्रह्मोस प्रस्तावित केले आहेत. त्याचबरोबर क्षेपणास्त्राचा स्ट्राइक रेटही वाढवण्यात आला. पूर्वी ते २९० किलोमीटरपर्यंत हल्ला करायचे, पण आता त्याची क्षमता ४०० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Scroll to Top