मुंबई- मायक्रोसॉफ्टनंतर आज भारतात यूट्यूबही डाऊन झाले. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना यूट्यूबवर व्हिडिओ पाहता येत नव्हते व व्हिडिओ अपलोडही करता येत नव्हते. ॲप आणि वेबसाइट दोन्हीवर वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागला. आज दुपारी १:३० वाजता डाऊन डिटेक्टर ॲपवर ही समस्या सुरू झाली. वेबसाइटनुसार ४३ टक्के लोकांनी व्हिडिओ पाहता येत नसल्याची समस्या नोंदवली. तर ३३ टक्के वापरकर्त्यांनी व्हिडिओ अपलोड करण्यात अडचणी येत असल्याची समस्या नोंदवली. त्याच वेळी, यूट्यूबच्या वेबसाइटवरही २३ टक्के वापरकर्त्यांना समस्या जाणवली. हे नेमके कशामुळे झाले याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या सर्व प्रकारच्या सेवांसह समस्या आणि आउटेजचा रिअलटाइम नोंद घेणारा डाउनडिटेक्टर हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्यावर यूजर्संनी यूट्यूब डाउन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या.