Home / News / भारतात कार्यक्रम करणार नाही! दिलजीत दोसांझचा निर्णय

भारतात कार्यक्रम करणार नाही! दिलजीत दोसांझचा निर्णय

चंदीगड – लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझने सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्याबद्दल नाराजी व्यक्त करत यापुढे भारतात कार्यक्रम करणार नाही, असा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

चंदीगड – लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझने सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्याबद्दल नाराजी व्यक्त करत यापुढे भारतात कार्यक्रम करणार नाही, असा निर्णय दिला. यामुळे दिलजीतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ च्या माध्यमातून दिलजीत भारतासह जगभरात ठिकठिकाणी कॉन्सर्ट करतो. सध्या भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे लाईव्ह कॉन्सर्ट सुरु आहेत. या कॉन्सर्टला दिलजीतच्या चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो. नुकताच दिलजीत दोसांझच्या दिल-ल्यूमिनाटी टूरचा एक कॉन्सर्ट चंदीगडमध्ये पार पडला. या कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिलजीत म्हणतो, “मला प्रशासनाला सांगावेसे वाटते की आपल्याकडे अशा पद्धतीचे लाईव्ह कॉन्सर्ट करण्यासाठी पायाभूत सुविधा फार कमी आहेत. अशा कॉन्सर्टमुळे उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतात. यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. कृपया याकडे लक्ष द्या. लाईव्ह कॉन्सर्टच्या मध्यभागी माझ्या कार्यक्रमाचा स्टेज आणि आजुबाजूला प्रेक्षक अशी व्यवस्था असावी. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता येते. याबाबतीत जोपर्यंत काही सुधारणा होत निघत नाही. तोपर्यंत मी भारतात कॉन्सर्ट करणार नाही.

Web Title:
संबंधित बातम्या