नवी दिल्ली : ऍपल ची सर्वात मोठी पुरवठादार असलेल्या फॉक्सकॉन कंपनी भारतात कर्मचारी संख्या वाढवणार आहे. भारतात कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीच्या भारतातील प्रतिनिधी त्यांच्या लिंक्डइन अकाउंटवरील पोस्टाद्वारे ही माहिती दिली आहे. फॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी ली यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ही घोषणा केली.
फ़ॉक्सकॉनसाठी भारत ही एक वेगाने वाढणारी आणि मोठी बाजारपेठ आहे. यामुळे त्यांनी भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये उत्पादन सुविधांचा झपाट्याने विस्तार केला आहे. तैवान येथील आयफोन निर्माती कंपनी असलेल्या फॉक्सकॉनच्या तामिळनाडू येथील प्लांटमध्ये आधीपासूनच ४० हजार कर्मचारी काम करत आहेत. आता ली यांनी कर्मचारी संख्या दुपटीने वाढविण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी नेमकी किती कर्मचारी भरती करणार याचा निश्चित आकडा सांगितलेला नाही.